Latest

मुंबईची तरुणी अहिल्यानगरमध्ये आली आणि तिच्यासोबत नको ते घडलं…

लग्नाचं स्वप्न दाखवलं, विश्वास जिंकला आणि नंतर लग्नालाच नकार दिला ! मुंबईतील २१ वर्षीय तरुणीने अहिल्यानगरमध्ये एका तरुणाविरोधात गंभीर आरोप केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? सांगतो. आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी तक्रारीनुसार मुंबईच्या मालाडमध्ये राहणाऱ्या या तरुणीची सुमारे अडीच वर्षांपूर्वी अहिल्यानगरमधील आलमगीर येथे संदेश क्षेत्रे याच्याशी ओळख झाली. मोबाईलवर बोलणं वाढलं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं.

२०२५ मध्ये संदेशने तिला केडगावला भेटायला बोलावलं. तिथे लग्नाचं आश्वासन देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला. त्यानंतरही असाच प्रकार वारंवार घडल्याचं तक्रारीत नमूद आहे.

संदेशने तिची आपल्या आई-वडिलांशी भेटही घालून दिली होती. त्यामुळे लग्न होईल, अशी तिची अपेक्षा होती. मात्र, नंतर घरच्यांचा विरोध असल्याचं सांगून त्याने लग्नास नकार दिला.

२० ऑक्टोबरला भेटल्यानंतरही त्याने नकार दिल्याचं तरुणीचं म्हणणं आहे. अखेर २३ ऑक्टोबरला तिने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी संदेश क्षेत्रेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button