
फडणवीस सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम देण्याची घोषणा केली आहे. पण हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार आणि यासाठी केवायसी करावी लागणार का? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा होणार आहेत.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम ४ नोव्हेंबरपूर्वी जमा होणार आहे. शेतकऱ्यांची माहिती पंचनाम्यांदरम्यान संकलित करण्यात आली असून, त्यात ॲग्रीस्टॅक क्रमांक आणि बँक खात्याच्या तपशीलांचा समावेश आहे. या मदतीसाठी स्वतंत्र ई-केवायसी करण्याची गरज नाही.
तसंच, केंद्राकडून आपत्ती निवारण निधी मिळाल्यानंतर उर्वरित नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला काय वाटतं? शासनाचे पाच हजार रुपये कधीपर्यंत खात्यात येतील ? कमेंट मध्ये नक्की सांगा.





