
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा रंगू लागली आहे. पण, अचानक राष्ट्रवादीच्या विलीनकरणाच्या चर्चा का रंगत आहेत? सगळं सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.
मंडळी, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
या बैठकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, विलिनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद झाल्याचं म्हटलं होतं. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून यापूर्वीही विलिनीकरणाच्या चर्चांना नकार देण्यात आला आहे. आता या कथित गुप्त बैठकीमागे नेमकं काय राजकारण आहे?
दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येणार की ही चर्चाही केवळ चर्चाच ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.





