Latest

संत माऊली व संत भगवानबाबा मल्टिस्टेटच्या चेअरमनला बेड्या… तरीही ठेवीदार चिंतेत, कारण काय ?

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री संत माऊली मल्टिस्टेट आणि श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट या दोन संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवरून मोठा गुंता निर्माण झालाय. नेमक काय घडलंय? सगळं सांगतो. मंडळी या दोन्ही संस्थांचे चेअरमन सुनील शिरसाठ आणि मयुर वैद्य यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलीय.

पण, या संस्थांमध्ये अनेकांनी मुदत ठेवी, बचत आणि सोनं तारणाशी संबंधित व्यवहारांतून पैसे गुंतवले. आता या संस्थांकडे एकूण किती ठेवी जमा झाल्या, किती पैसे परत केले, किती थकीत आहेत आणि उरलेला निधी नेमका कुठे गेला, याचा तपशील समोर येणं महत्त्वाचं आहे.

शिवाय, श्री संत माऊली संस्थेच्या नोंदणीच्या स्वरूपावरही प्रश्न उपस्थित झालेत. संस्था मल्टिस्टेट नसून निधी लिमिटेड कंपनी असल्याचा दावा केला जातोय. याची सत्यता तपासातून स्पष्ट होणं बाकी आहे. आता पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपयांचं सोनं सील केलंय.

मात्र, मालमत्ता शोधणं, पैशांचा माग काढणं आणि कायदेशीर प्रक्रियेतून वसुली करणं, ही मोठी आव्हानं आहेत. म्हणूनच ठेवीदारांसाठी खरा प्रश्न आहे—अटक झाली, पण आपली आयुष्यभराची पुंजी परत कधी मिळणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button