Latest

अभिमानास्पद : अहिल्यानगरच्या दोन क्रिकेटपटूंची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड; एकाला थेट कर्णधारपद !

अहिल्यानगरच्या क्रिकेटविश्वासाठी अभिमानाची बातमी! शहरातील हुंडेकरी स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या दोन खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे, यातील एका खेळाडूवर थेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

किरण चोरमले आणि अश्कान काझी अशी या दोन गुणवान क्रिकेटपटूंची नावे आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित कर्नल सी. के. नायडू ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.

किरण हा मधल्या फळीतील फलंदाज असून फिरकी गोलंदाजीही करतो. यापूर्वी त्याने महाराष्ट्राच्या विविध वयोगटांतील संघांचे प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच, भारतीय १९ वर्षांखालील संघाकडून आशिया कपमध्ये खेळण्याची संधीही त्याला मिळाली होती.

तर डावखुरा फलंदाज अश्कान काझी यानेही सातत्यपूर्ण कामगिरीतून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्रशिक्षक सरफराज बांगडीवाले आणि वसीम हुंडेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांनी हे यश मिळवलं आहे. आमदार संग्राम जगताप आणि गणेश गोंडाळ यांनीही दोघांचं अभिनंदन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button