Latest

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : कापूस हमीभावात विकायचाय ? मग ‘या’ तारखेपूर्वी नोंदणी करा; घरबसल्या कुठे नोंदणी करणार ?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये किमान आधारभूत किंमतीवर म्हणजेच MSP अंतर्गत कापूस विक्री करण्यासाठी भारतीय कापूस निगम अर्थात CCI कडून ‘कपास किसान’ मोबाईल ॲपवर नोंदणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

शेवगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी या ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन सभापती हनुमान पातकळ यांनी केले आहे.

नोंदणीसाठी कापूस पिकाची नोंद असलेला सात-बारा उतारा, आधारकार्ड, आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि पीक पाहणीची नोंद आवश्यक आहे.

वेळेत नोंदणी केल्यास शासनाच्या MSP खरेदी योजनेअंतर्गत कापूस विक्रीचा लाभ घेता येणार आहे. नोंदणीदरम्यान अडचण आल्यास CCI व्हॉट्सॲप हेल्पलाईन किंवा बाजार समितीतील शेतकरी मदत सुविधा कक्षाचा वापर करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button