Latest

दुष्काळाच्या झळा…; लाखांची गाय थेट हजाराला….! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये जनावरांच्या किंमतीत मोठी घसरण !

अहिल्यानगरच्या लोणीतील प्रसिद्ध गायींच्या बाजारात यंदा दुष्काळाचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. हजारो गायींची आवक होत असली, तरी खरेदीदारांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

परराज्यांमध्येही दुष्काळी परिस्थिती असल्याने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातमधून होणारी मागणी तब्बल ८० टक्क्यांनी कमी झाली आहे.

मागील वर्षी दर बुधवारी सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल होत होती. यंदा ती जवळपास ८ कोटींवर आली आहे. म्हणजेच एका बाजारदिवशी तब्बल ४ कोटींची घट झाली.

उत्तम होल्स्टीन गाय गेल्या वर्षी दीड लाख रुपयांपर्यंत विकली जात होती. आता त्याच गायीचा दर सुमारे एक लाख रुपयांवर आला आहे.
चारा, पाणी, औषधोपचार आणि देखभालीचा खर्च वाढल्याने पशुपालकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. जनावरं सांभाळायची की घर चालवायचं, असा प्रश्न निर्माण झाला असून, बाजारातील मंदीचा फटका थेट पशुपालकांच्या खिशाला बसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button