
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी रोहित पवारांचं कौतुक केलं आणि भविष्यात ते मंत्रिमंडळात सहकारी म्हणून दिसू शकतात, असं म्हटलंय. आता यावर रोहित पवारांनी नितेश राणेंबाबत थेट मोठं वक्तव्य केलं.“नितीश भाऊ भाजपमध्ये राहणार नाहीत. ते भाजप सोडतील.
आमच्यासोबत आले तर आपण एकत्र मंत्री म्हणून राहू शकतो,” असं रोहित पवार म्हणाले. इतकंच नाही, तर गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत मागे गेला असल्याचा दावा करत, “आपण महाराष्ट्राला पुन्हा उंचीवर घेऊन जाऊ शकतो,” असंही त्यांनी म्हटलं.
तसंच, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या काही नेत्यांना आपल्या निर्णयाची जाणीव झाली असून ते परत येत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.
आणि नितेश राणेंना उद्देशून त्यांचा शेवटचा संदेश होता—“भाजप सोडून राणे आमच्यासोबत आलेत तर वेलकम ब्रो!” आता नितेश राणे काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.





