Latest

मोठी बातमी : डिझेल ३ आणि पेट्रोलच्या दरात थेट ५ रुपयांची वाढ…..; आता ‘या’ पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल भरणे होणार महाग

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे ! नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. ३ ऑक्टोबरपासून पेट्रोल प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहे.

या दरवाढीनंतर नायराच्या पेट्रोलचा दर ११७ रुपये २३ पैसे, तर डिझेलचा दर १०१ रुपये ५७ पैसे प्रतिलिटर झाला आहे. विशेष म्हणजे, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या दरांमध्ये मात्र ३ ऑक्टोबरला बदल झालेला नाही.

या कंपन्यांकडे पेट्रोलचा दर सुमारे ११२ रुपये ४४ पैसे, तर डिझेलचा दर ९९ रुपये ५ पैसे आहे.म्हणजेच नायरा आणि सरकारी कंपन्यांच्या पेट्रोलच्या दरात जवळपास ४ रुपये ७९ पैसे, तर डिझेलमध्ये २ रुपये ५० पैशांचा फरक निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button