Latest

दुष्काळात मुळा नदी धावली शेतकऱ्यांच्या मदतीला….; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका निर्णयाने अहिल्यानगरच्या त्या ३२ गावांना दिलासा

दुष्काळाने शेती होरपळत असताना मुळा नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे ३२ गावांच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ! राहुरी आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुळा धरणातून नदीपात्रात तब्बल अर्धा टीएमसी म्हणजेच ५०० एमसीएफटी पाणी सोडण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टंचाई आढावा बैठकीत याबाबत घोषणा केली. या पाण्यामुळे डिग्रस, मानोरी, मांजरी आणि वांजुळपोई असे अनेक बंधारे भरले जाणार आहेत.

विशेष म्हणजे, या निर्णयाचा फायदा सुमारे ३२ गावांतील तीन हजार हेक्टर शेतीला होण्याची अपेक्षा आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी साठल्याने केवळ सिंचनाचाच प्रश्न सुटणार नाही, तर परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळीही वाढण्यास मदत होणार आहे.

२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता पाणी सोडण्यात येणार असून, सुरक्षेसाठी नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. मांजरी सेवा संस्थेच्या सभेत या निर्णयाचे स्वागत करत विखे यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. पण, शेतकऱ्यांसाठी मुळा नदीचं हे पाणी नवसंजीवनी देणार ठरणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button