Latest

पतीची ती मागणी, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल ! रेल्वेसमोर उडी मारली आणि त्यानंतर…. ; नगरमध्ये काय घडलं ? वडिलांनी केला मोठा खुलासा !

लग्नानंतर ज्या घराला आपलं मानलं, त्याच घरात वारंवार होणारा छळ एका महिलेच्या आयुष्याचा शेवट ठरल्याचा आरोप आहे. अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक येथे ही दुर्दैवी घटना घडली. निर्मला अविनाश शिंदे असं मृत विवाहितेचं नाव आहे.

२००४ मध्ये निर्मला यांचा अविनाश शिंदे यांच्याशी विवाह झाला होता. मात्र, पतीची कंपनी आर्थिक अडचणीत आल्यानंतर २०२० पासून माहेरून पैसे आणण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठीही माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला जात होता. यासाठी शिवीगाळ, शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

कुटुंबीयांनी अनेकदा समजूत काढली, नातेवाईकांच्या बैठका घेतल्या; मात्र परिस्थिती बदलली नाही. अखेर १७ सप्टेंबरला निर्मला यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवलं.

वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडा आणि कौटुंबिक छळाचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button