Latest

धरणं भरलेली दिसतायत, पण आकडे काही वेगळंच सांगतात….; महाराष्ट्रातील धरणांमधील शिल्लक पाणीसाठ्याचे धक्कादायक वास्तव पहा..

राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी समोर आली असून, यंदाच्या अनियमित पावसाचा मोठा परिणाम जलसाठ्यावर झाल्याचं दिसतंय. राज्यातील ३ हजार ३२ लहान-मोठ्या जलप्रकल्पांमध्ये सध्या ७५.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मात्र, मागील वर्षी याच काळात हा साठा ८८.२१ टक्के होता. म्हणजेच चालू वर्षात १२.३१ टक्क्यांची घट झाली आहे. सर्वाधिक चिंता मराठवाड्याची आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील ९२९ प्रकल्पांमध्ये केवळ ४५.७८ टक्के पाणी शिल्लक आहे.

मागील वर्षी हा साठा ८१.४३ टक्के होता. अमरावती विभागात ६३.९०, नागपूरमध्ये ७२.६१, तर नाशिक विभागात ८२.८६ टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागात ८७.९२ आणि कोकणात ९१.६९ टक्के साठा आहे.

आता खरीप हंगामानंतर पिण्याचं पाणी, शेती आणि इतर गरजांसाठी उपलब्ध साठ्याचं नियोजन प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button