Latest

प्रतीक्षा संपली ! उद्या जाहीर होणार दुष्काळाचा जीआर…. कोरड्या दुष्काळाच्या पॅकेज मध्ये शेतकऱ्यांना काय-काय मिळणार ? पहा….

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील गंभीर पीक परिस्थिती पाहता, शुक्रवारी दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय काढला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोयाबीन, कापूस, उडीद आणि तूर या पिकांवर मोठं संकट निर्माण झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं. दुष्काळाच्या निकषांनुसार ‘ट्रिगर वन’च्या आधारे दुष्काळ जाहीर केला जाईल. एखादा भाग सुरुवातीला वगळला गेला, तर ‘ट्रिगर थ्री’नुसार त्याचाही समावेश करण्याची शक्यता आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी थेट मदत, चारा आणि पाण्याची व्यवस्था, अन्नधान्याची उपलब्धता यावर सरकार काम करणार आहे. पाणी उपलब्ध असलेल्या भागात रब्बी पिकांसाठीही मदत दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचंही सरकारने सांगितलं. तसंच, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामं काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button