Latest

हॉटेल व्यावसायिक, पानटपऱ्या, किराणा दुकानें अचानक बंद….! अकोलेत ‘FDA’ च्या एन्ट्रीनंतर नेमक काय घडलं ?

अकोले तालुक्यात गुटखा विक्रीविरोधात अखेर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अकोले, राजूर आणि कोतुळ परिसरातील गुटखा विक्रीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर FDAच्या पथकाने अकोले शहरात थेट धडक दिली.

गुरुवारी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी शहरातील चार ठिकाणी तपासणी केली. कारवाईची चाहूल लागताच काही पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि हॉटेल व्यावसायिकांनी दुकाने बंद केल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत रोहिदास आंबेरे, अभिजीत नाईकवाडी आणि नंदकुमार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यात गुटखाबंदीला अनेक वर्षे झाली असली, तरी अकोले, राजूर, कोतुळ आणि भंडारदरा परिसरात गुटखा विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता FDAच्या कारवाईनंतर अवैध गुटखा विक्रीची साखळी कितपत थांबते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button