
मंडळी, आता पुन्हा घरगुती LPG सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागणार असल्याच्या चर्चा आहेत. पण यामागील सत्यता काय? आहे. जाणून घेऊयात.
इराण-अमेरिका तणावाचा थेट परिणाम आता तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे! होर्मुज सामुद्रधुनीतून तेल आणि गॅसची वाहतूक अडचणीत आल्याने एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण होऊ शकतो.
मात्र, भारतासाठी सध्या परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. कारण पूर्वी भारताच्या सुमारे ९० टक्के एलपीजी आयातीचा संबंध होर्मुज मार्गाशी होता, पण आता अमेरिका आणि इतर देशांकडूनही एलपीजीची आयात केली जात आहे.
देशांतर्गत उत्पादनही वाढवले जात आहे. सध्या भारत दररोज सुमारे ३७ ते ३८ हजार मेट्रिक टन एलपीजी तयार करत आहे. तरीही होर्मुज सामुद्रधुनी सलग एक आठवडा बंद राहिली, तर पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.
ऑगस्टमध्ये भारताची एलपीजी आयात २५ टक्क्यांनी घटून १४.५ लाख टन झाली आहे. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नसले तरी, युद्ध आणखी चिघळल्यास सिलेंडरच्या उपलब्धतेवर आणि किमतीवर परिणाम होण्याची शक्यता नक्कीच आहे.





