Latest

जामिनावर सुटताच फटाक्यांचा जल्लोष….; रीलच्या नादात भाईगिरी, अहिल्यानगर पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा ! नेमक काय घडलं ?

अहिल्यानगरमध्ये गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात कारवाई झाल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या सद्दाम हुसेन पठाण याचा जल्लोष चांगलाच चर्चेत आला. कारागृहातून बाहेर पडताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. याचवेळी या जल्लोषाचा व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला.

व्हिडिओमध्ये भाईगिरी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रदर्शन केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी तातडीने दखल घेतली.

पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या पथकाने व्हिडिओच्या आधारे सद्दाम हुसेन पठाण याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या कारवाईनंतर पठाणने आपली चूक मान्य करत माफी मागितली.

तसंच अशाप्रकारे फटाके फोडून जल्लोष करू नये आणि भाईगिरीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करू नयेत, असं आवाहन केलं. रीलच्या नादात कायदा हातात घेतल्यास कारवाई होणार, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button