
मंडळी, सध्या 8 व्या वेतन आयोगाबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. कर्मचारी संघटना पगारवाढ, पेन्शन सुधारणा, भत्ते आणि वार्षिक वेतनवाढीसाठी आक्रमक झाल्या आहेत. आयोगाचे सदस्य विविध राज्यांमध्ये जाऊन कर्मचारी संघटनांच्या बैठका घेत आहेत.
दिल्लीमध्ये रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या संघटनांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तेलंगाणा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही आयोगाने दौरे केले आहेत. कर्मचारी संघटनांकडून वेतन, पेन्शन आणि कोरोना काळातील थकबाकीबाबत मागण्या मांडल्या जात आहेत.
सध्या सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टरची आहे. 7 व्या वेतन आयोगात तो 2.57 होता. आता तो 3.83 करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यामुळे पगारात मोठी वाढ होऊ शकते.
याशिवाय वार्षिक इन्क्रीमेंट 3 टक्क्यांवरून 5 ते 6 टक्के करण्याची मागणीही होत आहे. पेन्शन समानता आणि महागाई भत्त्यात मोठे बदल करण्यासाठीही कर्मचारी संघटना दबाव वाढवत आहेत.





