
अहिल्यानगरसह राज्यभरात आरटीओच्या सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन झाल्या आहेत पण तरीही एक मोठा प्रश्न कायम आहे; लोक अजूनही एजंटांकडेच का जात आहेत? मंडळी, रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘सारथी’ आणि ‘वाहन 4.0’ या प्रणालीद्वारे तब्बल 105 सेवा ऑनलाईन केल्या आहेत.
नवीन वाहन नोंदणी, मालकी हस्तांतरण, फिटनेस सर्टिफिकेट, ई-चलान भरणे तसेच लर्निंग लायसन्स, पक्के लायसन्स, नूतनीकरण, पत्ता बदल ही सगळी कामे आता एका क्लिकवर उपलब्ध आहेत. यामुळे वेळ आणि पैशांची बचत व्हायला हवी होती आणि एजंटांचा त्रास संपायला हवा होता.. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसत आहे.
अनेक वेळा नागरिक स्वतः अर्ज करतात, पण त्यावर कार्यवाही उशिरा होते त्यामुळे त्यांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. याउलट एजंटांकडून अर्ज केल्यास काम लवकर होत असल्याचं चित्र आहे. याचाच फायदा घेत काही एजंट आता ऑनलाईन सेवांमध्येही घुसले आहेत.
ते शासकीय शुल्कापेक्षा जास्त पैसे घेऊन कामे करून देतात आणि नागरिकही वेळ वाचवण्यासाठी त्यांच्याकडेच वळतात. मंडळी, डिजिटल युगात सेवा सोपी आणि पारदर्शक व्हायला हव्या होत्या; पण जर सामान्य माणसालाच त्याचा फायदा मिळत नसेल, तर या ऑनलाईन व्यवस्थेचा उपयोग काय? हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटत? कमेंट करा..





