
बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गावर मोठा बदल घडतोय. या मार्गाचं विद्युतीकरण आता पूर्ण झालं आहे आणि ‘इंटर-लॉकिंग’चं काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत डिझेल रेल्वेमुळे १६७ किमी अंतर पार करायला तब्बल ५ तास २५ मिनिटे लागत होती.
आता चित्र बदलणार आहे. इलेक्ट्रिक रेल्वे सुरू झाल्यानंतर हा प्रवास फक्त २ तास ३० मिनिटांत पूर्ण होणार! म्हणजे वेळेची मोठी बचत आणि अधिक आरामदायी प्रवास.याशिवाय, डिझेलचा खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक सेवा मिळणार आहे.
पुढे बीड ते परळी मार्ग पूर्ण झाल्यावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्याही सुरू होण्याची शक्यता आहे.सध्या इंटर-लॉकिंग आणि काही ठिकाणी मोबदल्याच्या प्रश्नांमुळे काम थोडं अडकलं आहे. पण हे पूर्ण झालं, तर हा मार्ग गेमचेंजर ठरणार आहे.तुम्हाला काय वाटत हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर प्रवासात खरंच मोठा बदल होईल का?





