
अहिल्यानगरमधून एक सकारात्मक आणि थोडी आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे.. पहिलीत प्रवेश घ्या आणि वर्षभराची घरपट्टी-पाणीपट्टी फ्री! असा अनोखा उपक्रम एका गावात सुरू करण्यात आला आहे.
मंडळी, राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेत हा अभिनव प्रयोग राबवला जात आहे. ग्रामीण भागात अनेक वेळा विद्यार्थ्यांची संख्या कमी होत जाते, पालक मुलांना खासगी शाळांकडे वळवतात आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होतो.
हीच परिस्थिती बदलण्यासाठी संक्रापूर गावातील माजी विद्यार्थी आणि सध्या पुण्यातील उद्योजक असलेले संदीप चव्हाण यांनी एक वेगळीच पुढाकार घेतला आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संपूर्ण वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी ते स्वतः भरणार आहेत.
या उपक्रमामागे एकच उद्देश आहे.. जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत आणि गरीब कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. या उपक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचेही सहकार्य मिळत आहे.
मंडळी, शिक्षणासाठी असा विचार आणि पुढाकार खूप महत्वाचा असतो. छोटासा निर्णयही मोठा बदल घडवू शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. तुमच्या काय मत आहे? कमेंट करा..





