Latest

अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थिनींसाठी झेडपीचा मोठा निर्णय ! आता MS-CIT संगणक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत

MS-CIT करायची आहे, पण फी परवडत नाही? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे ! मंडळी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने आठवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठी मोफत एमएस-सीआयटी संगणक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या योजनेसाठी सुमारे ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील ६०० हून अधिक विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

प्रत्येक विद्यार्थिनीच्या प्रशिक्षणासाठी सुमारे पाच हजार रुपयांचा खर्च जिल्हा परिषद करणार आहे. एमकेसीएलच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाईल. या कोर्समुळे संगणकाचे मूलभूत ज्ञान, इंटरनेटचा वापर, ऑनलाइन सेवा आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करता येतील.

तब्बल १२ वर्षांनंतर ही योजना पुन्हा सुरू होत असल्याने विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भविष्यातील शिक्षण आणि रोजगारासाठी हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button