
तुम्हाला कोणी म्हणत असेल, ‘पैसे द्या… शेअर मार्केटमधून दुप्पट करून देतो’, तर आधी हा व्हिडीओ पूर्ण पहा. मंडळी, अहिल्यानगरमध्ये एका 24 वर्षीय तरुण व्यावसायिक बालाजी अंबादास यनगंदुल तब्बल 58 लाख 80 हजार रुपयांची कथित फसवणूकीची घटना समोर आली आहे.
तक्रारीनुसार, मन अजयकुमार कांकरिया आणि अभिनंदन अजयकुमार कांकरिया यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत बालाजी यांचा विश्वास संपादन केला.
ऑगस्ट 2025 ते मार्च 2026 या कालावधीत त्यांनी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात वेळोवेळी 58 लाख 80 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर बालाजी यांनी पैसे परत मागितले असता आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली आणि अखेर रक्कम परत देण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर बालाजी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. आरोप सिद्ध होणे अद्याप बाकी आहे.





