Latest

जामखेडच्या व्यावसायिकाला पेट्रोल पंप डीलरशिपचं स्वप्न पडलं महागात ; डीलरशिप आणि लायसन्सच्या बहाण्याने 84 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील व्यावसायिक उदय गुलाबराव शिंदे यांची तब्बल 84 लाख 53 हजार रुपयांची कथित ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

तक्रारीनुसार, सौरभ अग्रवाल याने जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप आणि परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देत उदय शिंदे यांच्याशी संपर्क साधला.

ऑक्टोबर 2025 ते जुलै 2026 या कालावधीत प्रोसेसिंग फी आणि इतर विविध कारणे सांगून वेळोवेळी लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. पैसे भरूनही डीलरशिप मिळाली नाही, तसेच नंतर आरोपींनी संपर्कही तोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर उदय गुलाबराव शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सौरभ अग्रवाल, शिंदे इंजिनिअर आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button