
ऑक्टोबर हिटचा तडाखा हळूहळू कमी होतोय आणि थंडीची चाहूल लागलीये. अशातच आता हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. नेमका कसा आहे नवा हवामान अंदाज? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे काही भागांत ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, उत्तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशातील कमी दाबाचं क्षेत्र, तसेच अरबी समुद्रापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील हवामान बदललं आहे. दुसरीकडे दक्षिण अंदमान समुद्रातही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. तर मग मंडळी तुमच्याकडे पावसाची स्थिती कशी आहे? कमेंट करून नक्की सांगा.





