Latest

शनिशिंगणापूर देवस्थानाच्या गैरव्यवहाराची आता हायकोर्टानेच घेतली दखल ! थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय ?

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनैश्वर देवस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलंय. देवस्थानातील कथित गैरव्यवहार आणि शासनाच्या दिरंगाईवरून आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेच भूमिका घेतली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन दरंदले यांनी देवस्थानातील गैरव्यवहारांविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यापूर्वी न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना आठ आठवड्यांत याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, मुदत संपूनही शासनाकडून उत्तर किंवा कारवाई झाली नाही. त्यामुळे दरंदले यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना खंडपीठाने मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना नोटीस बजावली आहे.

देवस्थानातील कथित ॲप घोटाळा, बनावट पावत्या, क्यूआर कोड आणि कर्मचारी भरतीची सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आता १४ डिसेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button