Latest

यंदा दिवाळीत पाऊस पडणार… कस असणार महाराष्ट्रातील हवामान ? पुढील चार आठवड्याचा हवामान अंदाज आला !

दिवाळीत पाऊस पडणार की थंडीचा जोर वाढणार? हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा पावसाचा अंदाज जाहीर केलाय. महाराष्ट्रासाठीही महत्त्वाचे संकेत देण्यात आलेत. नेमका कसा आहे नवा हवामान अंदाज? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, पहिला आठवडा म्हणजे २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर. या काळात पूर्व आणि ईशान्य भारतासह काही राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. दुसरा आठवडा, ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान दक्षिण भारतात पाऊस सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

तिसरा आठवडा म्हणजे १२ ते १९ नोव्हेंबर आणि चौथा आठवडा १९ ते २६ नोव्हेंबर. या दोन्ही काळातही दक्षिण भारतात पाऊस सरासरीच्या आसपास राहण्याचे संकेत आहेत.

महाराष्ट्रात मात्र विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडू शकतो. नाशिक आणि अहिल्यानगरसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. म्हणजे पुढील चार आठवडे देशात पावसाचं चित्र वेगवेगळं राहणार आहे. तर मग मंडळी तुमच्या भागात पाऊस पडतोय का? कमेंट करून नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button