Latest

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून स्मशानभूमीकडे का पाहत नाहीत ? जाणून घ्या धक्कादायक कारण !

तुम्ही कधी लक्ष दिलंय का ? अंत्यसंस्कार झाल्यानंतर लोक स्मशानभूमीकडे मागे वळून पाहत नाहीत. कारण की ही फक्त एक परंपरा नाही, तर त्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारण असल्याचं सांगितलं जातं.

मंडळी, गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर शरीर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं, पण आत्मा अमर असतो. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याला ना अग्नी जाळू शकतो, ना शस्त्र छेदू शकतं, असं सांगितलं आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, मृत्यूनंतर काही आत्मे आपल्या कुटुंबाविषयी असलेल्या प्रेमामुळे आणि मोहामुळे त्यांच्याभोवतीच राहतात. अशावेळी जर नातेवाईकांनी मागे वळून पाहिलं, तर आत्म्याचा मोह वाढू शकतो आणि त्याच्या पुढील प्रवासात अडथळा निर्माण होतो, असं मानलं जातं.

म्हणूनच अंत्यसंस्कारानंतर मागे न पाहण्याची प्रथा पाळली जाते. यामुळे आत्म्याला संसारातील बंधनांपासून मुक्त होऊन पुढे जाण्याचा संकेत मिळतो. याच कारणामुळे तेरावं, श्राद्ध आणि पिंडदान यांसारखे विधीही केले जातात. तर मग मंडळी, तुम्हाला ही माहिती आधी माहित होती का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button