
अहिल्यानगरचे SP सोमनाथ घार्गे यांची बदली मुंबईला झाली असून, त्यांच्या जागी मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे… पण हे नवे SP नेमके कोण आणि त्यांच्यासमोर कोणती आव्हाने आहेत ? सगळं सांगते पण त्याआधी हा व्हिडियो लाईक करा आणि अश्याच नवनवीन व्हिडीओज साठी अहिल्यानगर लाईव्हला फॉलो करा
नवीन SP म्हणून नियुक्त झालेले मुम्मका सुदर्शन हे महाराष्ट्र केडरमधील 2016 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभाव या मूल्यांवर त्यांचे बालपण घडले. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला.
प्रशिक्षणानंतर त्यांनी पुसद येथे प्रारंभीची सेवा बजावली. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आरमोरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम पहिले,पुढे परभणी येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिले. त्यानंतर नागपूर येथे गुन्हे शाखेचे उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली
यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी वाळू तस्करी, मद्य तस्करी आणि इतर अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीमा राबवल्या. त्यांच्या कारकीर्दीत कठोर शिस्त आणि परिणामकारक अंमलबजावणी यावर भर दिसून आला.
नगर जिल्ह्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नव्या एसपींसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. वाळू आणि अंमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांचा वापर, तसेच आर्थिक फसवणुकीचे प्रकार यावर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या पुढील धोरणांकडे लक्ष लागले आहे.





