Latest

काय सांगता ! आता भारतात येणार प्लास्टिकच्या नोटा ? RBI चा गेमचेंजर प्लॅन नेमका कसाय ?

आता फाटक्या, मळकट नोटांचा त्रास कायमचा संपणार आहे, कारण देशात लवकरच प्लास्टिक नोटा येण्याची शक्यता आहे.
मंडळी, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI आता देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमर नोटा आणण्याच्या तयारीत आहे.

वाढत्या कागदी नोटांच्या खर्चामुळे आणि खराब नोटांच्या समस्येमुळे हा पर्याय गांभीर्याने विचारात घेतला जात आहे. RBI च्या वार्षिक अहवालानुसार, 2025 मध्ये कागदी नोटा छापण्यासाठी तब्बल 6,372 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला.

शिवाय दरवर्षी अब्जावधी खराब आणि फाटक्या नोटा चलनातून बाहेर काढाव्या लागतात. विशेष म्हणजे 500 रुपयांच्या नोटा सर्वाधिक खराब होतात. प्लास्टिक नोटा जास्त काळ टिकतात, पाण्यात खराब होत नाहीत आणि सहज फाटत नाहीत.

तसेच बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही त्या प्रभावी मानल्या जातात. त्यामुळे RBI लवकरच पायलट प्रोजेक्ट सुरू करू शकते. सध्या जगातील जवळपास 60 देश प्लास्टिक नोटांचा वापर करत आहेत.

ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये पहिली प्लास्टिक नोट आणली होती. कॅनडा, सिंगापूर, मलेशिया आणि रोमानियासारखे अनेक देशही या नोटा वापरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button