Latest

काय बोंबलायचं ते बोंबला ! १०० एकरात लग्नामुळे पुन्हा चर्चेत आले इंदुरीकर महाराज

‘लग्न साधं करा’ असा संदेश देणारे Indurikar Maharaj आता स्वतःच्या मुलीच्या शाही लग्नामुळे चर्चेत आले आहेत… १०० एकरात होणाऱ्या या भव्य सोहळ्यामुळे टीका आणि समर्थन दोन्ही वाढलंय… पाहा संपूर्ण माहिती ह्या रीलमध्ये

इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह ३ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पार पडत आहे. गुंजाळवाडी शिवारातील तब्बल १०० एकर परिसरात हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, भव्य-दिव्य तयारीमुळे सर्वांचे लक्ष या विवाहाकडे लागले आहे.

या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती अपेक्षित असून, राज्यातील अनेक राजकीय नेते, आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे

मुलीच्या साखरपुड्यावरून झालेल्या टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराजांनी “लग्न आणखी जोरात करणार, काय बोंबलायचं ते बोंबला” असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते. त्याच भूमिकेप्रमाणे विवाह सोहळ्याची तयारीही मोठ्या थाटामाटात करण्यात आल्याचे दिसत आहे.

एकीकडे साधेपणाचा संदेश आणि दुसरीकडे शाही सोहळा यामुळे निर्माण झालेल्या विरोधाभासावरून चर्चा रंगली असली, तरी उद्याच्या विवाह सोहळ्यातील भव्यतेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.“तुमच्या मते हे योग्य आहे का? कमेंटमध्ये सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button