
दिवसभर उकाडा आणि रात्री अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला आणि अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.मग आता जिल्ह्यात किती दिवस पाऊस पडणार ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री सावेडी, पाईपलाईन रोड, जुने शहर, भिंगार आणि ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. याआधी २९ ऑक्टोबरलाही शहरात पाऊस झाला होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मात्र, या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. काढणीला आलेली बाजरी, कापूस आणि उघड्यावर असलेल्या शेतमालाला नुकसान होण्याची भीती आहे.
आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ आणि २ नोव्हेंबरलाही जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे. तर मग मंडळी तुमच्याही भागात पावसाने हजेरी लावली आहे का? कमेंट करून नक्की सांगा.





