Latest

तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला हरताळ…..; ठाकरे सेनेच्या नगरसेवकाचा प्रताप, अखेर त्या हॉटेलचं लायसन्स रद्द !

अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे…! खासदार निलेश लंके यांच्या एका खंद्या समर्थकाला जबर धक्का बसला आहे.
मंडळी शहरातील हॉटेल यश पॅलेसवर अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA ने थेट कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, हॉटेलचा परवानाच रद्द करण्यात आला आहे.

खरेतर FDAच्या पथकाने आधीच हॉटेलची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये काही त्रुटी आढळल्यानंतर हॉटेल प्रशासनाला आवश्यक सुधारणा करण्याची नोटीसही बजावण्यात आली. मात्र, नोटीसनंतरही अपेक्षित सुधारणा न झाल्याने आता प्रशासनाने कठोर निर्णय घेतलाय.

सहायक आयुक्त गौरव जगताप यांनी सोमवारी हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा आदेश काढलाय. या कारवाईमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मात्र, या प्रकरणाला राजकीय किनारही असल्याने चर्चांना अधिकच उधाण आलंय. योगीराज गाडे हे उबाठा शिवसेनेचे नगरसेवक आणि खासदार निलेश लंके यांचे समर्थक आहेत, तर शशिकांत गाडे हे उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे गाडे बापलेकांच्या हॉटेलवर झालेल्या FDA कारवाईची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button