Latest

कांद्याला भाव नाही… शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! एकरी ४० हजारांचा होतोय तोटा

कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलेत. शेतकऱ्यांना एकरी तब्बल ४० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

एका एकरात साधारण बारा टन कांद्याचे उत्पादन गृहित धरले, तर सध्याच्या पाच रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना फक्त साठ हजार रुपये मिळतात. पण याच कांद्याचा उत्पादन खर्च जवळपास एक लाख रुपये जातो.

म्हणजेच सरळ ४० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. यामागे बारदाण्याचे दर १२ रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत वाढणे, मजुरीत झालेली वाढ, अवकाळीपासून संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हरवर सुमारे १५ हजारांचा खर्च, तसेच उधारी आणि कर्जाचा वाढता ताण ही प्रमुख कारणे आहेत.

परिणामी शेतकरी शेती करत असले तरी नफा नाही, तर फक्त तोटाच होत आहे या परिस्थितीत सरकार कमी पडतंय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button