
अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा साखर कारखान्यांचा मुद्दा चर्चेत आलाय. मालक बदलले, नावं बदलली पण शेतकऱ्यांची थकबाकी मात्र अजूनही तशीच आहे. मंडळी, हिरडगाव येथील गौरी शुगर आणि ढवळगाव येथील ओंकार शुगर हे दोन्ही खाजगी साखर कारखाने सध्या बाबुराव बोत्रे यांच्या मालकीचे आहेत. यापूर्वी हे कारखाने पाचपुते कुटुंबाच्या ताब्यात होते.
त्या काळातही शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यानंतर कारखाने मालक बदलले, नावं बदलली आणि शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आता परिस्थिती सुधारेल. पण वास्तव मात्र वेगळंच दिसत आहे.
आजही या दोन्ही कारखान्यांकडे सुमारे ७० कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला अजूनही मिळालेला नाही.
आता मोठा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना त्यांचे पैसे नेमके कधी मिळणार? आणि या प्रश्नावर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार? कारण हा फक्त एका कारखान्याचा मुद्दा नाही तर हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे.\ तुम्हाला काय वाटत? अशा कारखान्यांवर काय कारवाई व्हावी? कमेंट करा..





