
पाऊस कधी येणार.. हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. हवामान खात्याचे अंदाज एकीकडे आहेत पण दुसरीकडे निसर्ग स्वतःच पावसाची चाहूल देऊ लागला आहे.
मंडळी, शेकडो वर्षांपासून ग्रामीण भागात काही निसर्ग संकेत पाहून पावसाचा अंदाज बांधला जातो आणि आता असेच संकेत पुन्हा दिसू लागले आहेत.
सध्या पाली अंडी घालत आहेत, काही ठिकाणी त्यातून पिलंही बाहेर आली आहेत.. हा साधारणपणे १० ते २० दिवसांत पाऊस येण्याचा संकेत मानला जातो.
तसंच वाळवीने आपली वारुळे बंद करण्यास सुरुवात केली आहे. हा साधारण ८ ते १० दिवसांत पावसाचा इशारा मानला जातो.
याशिवाय सापांची वीण सुरू झाली आहे आणि मुंग्यांची रांग लागून त्या अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना दिसत आहेत हेही पावसाचे ठोस संकेत मानले जातात.
म्हणूनच अनेक शेतकरी या संकेतांवर विश्वास ठेवून शेतीकामाला सुरुवात करत आहेत. मंडळी, विज्ञान कितीही पुढे गेलं तरी निसर्गाचे संकेत अजूनही तितकेच प्रभावी मानले जातात आणि हेच संकेत सांगत आहेत की पाऊस आता दूर नाही. मंडळी, ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडीओ शेअर करायला विसरू नका..





