Latest

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गावे…करोडोंची कमाई करतात

महाराष्ट्रात अशी काही गावे आहेत जी शहरांपेक्षा जास्त कमाई करत आहेत… शेती, पर्यटन आणि स्थानिक उद्योगांच्या जोरावर ही गावे करोडोंची उलाढाल करतायत… पाहा ही टॉप श्रीमंत गावे…या यादीतील अग्रस्थानी असलेल्या गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील कोणत्याही गावाचा समावेश नाही.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत हे गाव विशेषता कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात दरवर्षी १०० ते १५० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते.

नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. जलसंधारण, शाश्वत शेती आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमुळे या गावाने ८० ते १०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल गाठली आहे.

धार्मिक पर्यटनामुळे प्रसिद्ध असलेले शनि शिंगणापूर हे गावही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनले आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक येत असल्याने स्थानिक व्यवसाय, दुकाने आणि सेवांमधून ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असल्याचे मानले जाते.

तसेच राळेगणसिद्धी या गावाने ग्रामविकासाचा आदर्श घालून दिला आहे. जलव्यवस्थापन, सामाजिक उपक्रम आणि शाश्वत विकासामुळे या गावाची उलाढाल ४० ते ६० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button