Latest

गिअर पडला… ट्रॅक्टर पुढे सरकला… आणि त्यानंतर काही क्षणांतच भयंकर घडलं ! श्रीरामपूरात खळबळ

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगावच्या गोंधवणी परिसरात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय जगन्नाथ गवारे, वय अंदाजे ५० वर्षे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गोंधवणी परिसरात कैलास लबडे यांच्या विहिरीचे काम सुरू होते.

विहिरीत साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात होता. काल सायंकाळी चारच्या सुमारास ट्रॅक्टर विहिरीजवळ सुरु अवस्थेत उभा केला होता. त्यावेळी संजय गवारे ट्रॅक्टरवर बसले होते.

अचानक ट्रॅक्टरचा गिअर पडला आणि ट्रॅक्टर पुढे सरकत थेट विहिरीत कोसळला. गवारे हेही ट्रॅक्टरसोबत विहिरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शिरसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button