Latest

संगमनेर एमआयडीसीचं श्रेय आमदार खताळांचंच….पदवीधर आमदारांनी खोटं श्रेय घेऊ नये !

संगमनेर तालुक्यातील पठार भागात कौठे मलकापूर येथे एमआयडीसी उभारण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा आणि परिसराचा औद्योगिक विकास व्हावा, या उद्देशाने या प्रकल्पाची मागणी केली जात आहे.

मात्र, या एमआयडीसीच्या श्रेयावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. महायुतीचे शशांक नामन यांनी आमदार अमोल खताळ यांच्याच पाठपुराव्यामुळे हा विषय शासनदरबारी पुढे गेल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे खताळ यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे नामन यांनी म्हटले.

तसेच, एमआयडीसीबाबत आता केवळ अधिसूचना निघणे बाकी असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी या कामाचे खोटे श्रेय घेऊ नये, अशी टीका नामन यांनी केली. आता एमआयडीसीच्या श्रेयावरून संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button