Latest

शाळा सुरू असताना शिक्षक झोपले! विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे का?

शाळेच्या वेळेतच शिक्षक झोपलेले दिसले, तर विद्यार्थ्यांनी शिकायचं कोणाकडून? अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात असलेल्या ढोरसडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू असतानाच शिक्षक झोपेत असल्याचे उघड झाल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा ही शिक्षणाची मोठी आशा असते. मात्र, शिक्षकच कर्तव्यावर निष्काळजीपणा करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भविष्य घडणार कसे?

असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची शिक्षण विभागाने दखल घेत संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. समाधानकारक खुलासा न दिल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते अशा शिक्षकांवर काय कारवाई व्हायला हवी? कमेंटमध्ये सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button