Latest

मोबाईलमधून ‘ती’ नावे असलेली सुसाईड नोट गायब, त्रिमूर्तीचे सचिव घाडगेंच्या आत्महत्येप्रकरणी ट्विस्ट

नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनीष घाडगे आत्महत्येच्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय. मोबाईलमध्ये ठेवलेली सुसाईड नोटच गायब झाली आहे आणि त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. घाडगे यांनी संस्थेच्या कार्यालयातच स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली.

या घटनेनंतर त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवली होती, अशी माहिती समोर आली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, ही सुसाईड नोट आता गायब आहे. गेल्या दहा दिवसांपासून पोलिस तिचा शोध घेत आहेत, पण अजूनही ती सापडलेली नाही. या प्रकरणात घाडगे यांच्या पत्नीने सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांनी मयताचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्यात सुसाईड नोटचा फोटो सापडला आहे. त्या फोटोमध्ये काही नावांचा उल्लेख असून, त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे लिहिले असल्याची माहिती आहे.

मात्र मूळ चिठ्ठीच गायब असल्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – सुसाईड नोट कुणी गायब केली? आणि का? दरम्यान, पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. त्यामध्ये मनीष घाडगे हे स्वतः चिठ्ठी मोबाईलमध्ये ठेवताना दिसत आहेत. त्यानंतर ही चिठ्ठी नेमकी कुठे गेली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button