
उन्हाळ्यात 100-200 रुपयांचे काळे गॉगल्स वापरता? मग ही माहिती नक्की ऐका! कारण स्वस्त गॉगल्स तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांना अधिक नुकसान पोहोचवू शकतात. उन्हाळा सुरू होताच बाजारात विविध प्रकारचे काळे चष्मे दिसू लागतात.
अनेकजण फक्त स्टाईल आणि फॅशनसाठी ते खरेदी करतात. पण प्रत्येक काळा चष्मा डोळ्यांना सुरक्षित ठेवतोच असे नाही. जेव्हा आपण डार्क गॉगल्स घालतो, तेव्हा डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होतात कारण त्यांना प्रकाश कमी झाल्यासारखा वाटतो.
जर त्या चष्म्यात UV संरक्षण नसेल, तर सूर्याच्या हानिकारक UV-A आणि UV-B किरणा अधिक प्रमाणात डोळ्यांच्या आत पोहोचतात. यामुळे मोतीबिंदू, रेटिनाचे नुकसान आणि मॅक्युलर डिजनरेशनसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
काही वेळा हे नुकसान कायमस्वरूपीही ठरू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी गॉगल्स खरेदी करताना फक्त त्यांचा लूक पाहू नका. त्यावर UV400 Protection आहे का, हे नक्की तपासा. कारण स्टाईल महत्त्वाची आहेचं पण डोळ्यांचे आरोग्य त्याहून अधिक महत्त्वाचे आहे !





