Latest

शिर्डीत तब्बल १८ लाखांचे चोरीचे मोबाईल जप्त…. मोबाईल चोरीचं ‘झारखंड कनेक्शन’ उघड ! शिर्डीत मध्यरात्री नेमकं काय घडलं ?

दत्तनगर परिसरात पोलिसांनी केलेल्या मध्यरात्रीच्या कारवाईत तब्बल ५५ महागडे स्मार्टफोन जप्त करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत तब्बल १८ लाख ३४ हजार रुपये असल्याची माहिती आहे.

सप्टेंबरमध्ये झारखंडमधून आलेले दोन संशयित दत्तनगरमधील एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकताच दोघांनी घराच्या मागच्या दरवाजातून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

मात्र, घटनास्थळी पोलिसांना एक मोठी बॅग सापडली. तपासणी केली असता त्यामध्ये अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातून चोरीला गेलेले ५५ स्मार्टफोन आढळून आले.

या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी शिर्डी परिसरात गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button