Latest

कॉलेज बसवर हल्ला करणाऱ्या चौघांची श्रीरामपूर पोलिसांनी काढली धिंड !

भर रस्त्यात कॉलेज बस थांबवली, चार तरुण आलेत लाकडी दांडक्यांनी बसची तोडफोड केली, बस चालकाला मारहाण केली, ही घटना घडली श्रीरामपूर शहरात. या घटनेचा व्हिडीओ पाहता-पाहता संपूर्ण नगर जिल्ह्यात व्हायरल झाला. आता श्रीरामपूरमधील याच टोळक्यांना पोलिसांनी धडा शिकवलाय.

मंडळी, अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेजची बस कांदा मार्केट परिसरातून जात असताना, वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून चार जणांनी बस अडवली. यानंतर आरोपींनी लाकडी दांडक्यांनी बसची तोडफोड केली. बस चालक अशोक वहाटोळे यांनी प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही मारहाण करण्यात आली.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली.

पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काही तासांतच चारही आरोपींना अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपींची शहरातून धिंड काढत गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला. नक्कीच ही घटना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मोठा इशारा मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button