
गेल्या दशकात सोयाबीनच्या किमान आधारभूत किमतीत मोठी वाढ झाली. २०१४-१५ मध्ये प्रतिक्विंटल २,५६० रुपये असलेला एमएसपी २०२५-२६ मध्ये ५,३२८ रुपयांवर पोहोचला. त्याच काळात सोयाबीन तेलाचा किरकोळ दरही ६० रुपयांवरून तब्बल १४८.३१ रुपये किलो झाला.
पण इथेच मोठा प्रश्न आहे—या वाढीचा फायदा शेतकऱ्याला किती मिळाला? २०२५-२६ मध्ये सोयाबीनचा सर्वसमावेशक उत्पादन खर्च ३,५५२ रुपये प्रतिक्विंटल असल्याचे सरकारी आकडेवारीत नमूद आहे.
मात्र, बाजारात शेतकऱ्याला प्रत्येक वेळी एमएसपी मिळतोच असे नाही. आवक, मागणी-पुरवठा, गुणवत्तेचा दर्जा, वाहतूक आणि साठवणूक यामुळे प्रत्यक्ष बाजारभाव बदलतो.
शेतातून ग्राहकाच्या स्वयंपाकघरापर्यंत सोयाबीनच्या दरात अनेक टप्पे जोडले जातात. त्यामुळे तेल महागलं, एमएसपी वाढला… तरी शेतकऱ्याचा प्रत्यक्ष नफा किती वाढला, हा प्रश्न कायम आहे.





