Latest

कोणी प्रश्न लक्षात ठेवले, तर कोणी हाताने लिहून काढले… अखेर नीट पेपरफुटीचं धक्कादायक सत्य समोर !

मंडळी, देशभर गाजत असलेल्या NEET UG पेपर लीक प्रकरणात आता मोठे खुलासे होत आहेत. राजस्थानचे शिक्षक शशिकांत सुथार यांनी सर्वप्रथम या घोटाळ्याचा सुगावा लावला. परीक्षा संपल्यानंतर त्यांना WhatsApp वर Chemistry आणि Biology चे PDF मिळाले.

धक्कादायक म्हणजे, त्यातील अनेक प्रश्न मूळ परीक्षेत जसेच्या तसे आले होतेb! CBI तपासात लातूरच्या RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आले.

तपासानुसार, NTA प्रश्नपत्रिका पॅनलमध्ये असलेल्या शिक्षकांच्या मदतीने प्रश्न आधीच मिळवले जात होते. आरोपी मनीषा मांढरेने तिच्या जबरदस्त स्मरणशक्तीच्या जोरावर प्रश्न पाठ केले आणि नंतर ते लिहून दिल्याचा आरोप आहे.

यानंतर प्रश्नांची PDF तयार करून लाखो रुपयांत विक्री करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा डिलीट करण्यात आला, पण CBI ने तो पुन्हा रिकव्हर केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणती मोठी नावे समोर येणार ? हे पाहण्यासारखं राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button