Latest

Wi-Fi Router 24 तास सुरू ठेवता? एसीप्रमाणे तेही फुटू शकते? जाणून घ्या सविस्तर..

24 तास सुरू असलेला Wi-Fi राऊटरही धोकादायक ठरू शकतो का? एसीप्रमाणे त्यालाही आग लागू शकते का? सध्या अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झालाय. तज्ज्ञांच्या मते, Wi-Fi राऊटरमध्ये एसीसारखा मोठा स्फोट होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

कारण राऊटर कमी वीज वापरणारे उपकरण आहे. त्यामध्ये एसीसारखे कंप्रेसर किंवा गॅस नसतो. मात्र याचा अर्थ धोका अजिबात नाही असे नाही. राऊटरमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, प्रोसेसर, मेमरी चिप्स आणि पॉवर अडॅप्टर असतो.

हे सर्व घटक दीर्घकाळ सुरू राहिल्यामुळे तापू शकतात. विशेषतः कमी दर्जाचा राऊटर, निकृष्ट अडॅप्टर किंवा वीजपुरवठ्यातील चढ-उतार यामुळे ओव्हरहिटिंगची समस्या निर्माण होऊ शकते.

अनेकजण राऊटर टीव्हीच्या मागे, बंद कपाटात किंवा इतर उपकरणांच्या वर ठेवतात. अशा ठिकाणी उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि राऊटर अधिक गरम होतो.

तज्ज्ञांच्या मते, सर्वात मोठा धोका मूळ अडॅप्टरऐवजी स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे अडॅप्टर वापरल्याने निर्माण होतो. चुकीचा व्होल्टेज पुरवठा झाल्यास शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वाढते.

एकंदरीत, Wi-Fi राऊटर एसीसारखा मोठा स्फोट होण्याची शक्यता फारच कमी असली तरी ओव्हरहिटिंग, शॉर्टसर्किट आणि आग लागण्याचा धोका पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर हा धोका सहज टाळता येऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button