
मंडळी, दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसमोर एकच प्रश्न उभा आहे पुढे कोणता कोर्स निवडायचा ? कोणत्या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी आहेत ? पण आता या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२६’मध्ये.
महाविद्यालय निवडण्यासाठी, करिअरची दिशा निश्चित करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. हेच लक्षात घेऊन सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२६’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. संजीवनी विद्यापीठ हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. सहप्रायोजक एमआयटी विश्व प्रयाग युनिव्हर्सिटी आहे
मित्रहो, ६ आणि ७ जून रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पोलिस लॉन्स, न्यू आर्ट्स कॉलेजसमोर, लालटाकी रोड, अहिल्यानगर येथे हा एक्सपो भरणार आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंगसह अनेक अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. तसेच JEE, NEET, CET आणि स्पर्धा परीक्षांबाबतही तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. संजीवनी विद्यापीठ हे मुख्य प्रायोजक असून एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सहप्रायोजक आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सेमिनार, करिअर गाईडन्स आणि लकी ड्रॉद्वारे बक्षिसे जिंकण्याची संधीही आहे.





