Latest

राजकीय पदाचा बडेजाव बाजूला ठेवत आमदार खताळ, लंघे भाविकांमध्ये रमले सप्ताहात भाविकांसोबत घेतला महाप्रसादाचा आस्वाद

राजकीय पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून संगमनेरचे आमदार अमोल खताळ व नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहात सहभाग घेतला. राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दोन्ही आमदारांनी सर्वसामान्य महिला-पुरुष भाविकांसोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

धनगरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास आमदार खताळ, आमदार लंघे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, सरूनाथ उंबरकर, अभिजीत पुंड यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन संत गंगागिरी महाराजांचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार खताळ, आमदार लंघे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह मान्यवरांनी रामगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. रामगिरी महाराज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा योगीराज गंगागिरी महाराजांची शाल देऊन सन्मान करण्यात आला.

सप्ताहस्थळी आमदार खताळ व आमदार लंघे यांनी कोणतीही राजकीय औपचारिकता न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून सहभाग घेतला. त्यांनी महिला-पुरुष भाविकांशी संवाद साधत त्यांच्या भावना व अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर दोन्ही आमदारांनी भाविकांसोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा, बंधुभाव तसेच संस्कारांची भावना अधिक दृढ होत असते. अशा सप्ताहांच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि परस्परांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते, असे आमदार अमोल खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी सांगितले. राजकीय पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सर्वसामान्य नागरिक व भाविकांमध्ये सहजपणे मिसळून दोन्ही आमदारांनी सप्ताहात सहभाग घेतल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button