Latest

सुरत-नाशिक-अहिल्यानगर ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत मोठी बातमी ! ‘या’ गावांमधील भूसंपादन निवाड्यांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती

सुरत-नाशिक-अहिल्यानगर ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे ! मुंबई उच्च न्यायालयाने काही गावांमधील भूसंपादनाच्या अंतिम निवाड्यांना स्थगिती दिली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय.

मंडळी, संगमनेर तालुक्यातील वडझरी बु., तळेगाव, जुनेगाव, शहादतपूर, मिरपूर आणि वडझरी खुर्द या गावांतील शेतकऱ्यांनी मिळणारा मोबदला अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेतला होता.

बाजारमूल्य ठरवताना अधिक मूल्याच्या खरेदी-विक्री व्यवहारांचा योग्य विचार झाला नसल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय, प्रशासनाने १३ मे २०२६ रोजी पेमेंट नोटिसा दिल्या; मात्र देय व्याजाबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

या प्रकरणी अॅड. अजित बबनराव काळे, अॅड. साक्षी अजित काळे आणि अॅड. आरिफ नुरा पटेल यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या स्थगितीमुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य आणि वाढीव मोबदल्याच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button