Latest

तुकाराम मुंढेंवर खळबळजनक आरोप ! पहिल्यांदाचं मुंढेंच्या कारवाईवर संशय ; गोरस भंडारवरची धाड नेमकी कोणासाठी ? नेमक प्रकरण काय ?

राज्यात भेसळविरोधी मोहिमेसाठी ओळखले जाणारे आयएएस तुकाराम मुंढे यांची कारवाई पहिल्यांदाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वर्ध्याच्या ऐतिहासिक ‘गोरस भंडार’वर टाकलेल्या सीलमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून उभी राहिलेली वर्ध्यातील गोरस भंडार ही केवळ दुग्धसंस्था नसून शेकडो शेतकरी कुटुंबांचा आधार मानली जाते. मात्र अन्न व औषध प्रशासनाने कारखान्यावर छापा टाकत उत्पादन बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे तपासणीचा अंतिम अहवाल येण्यापूर्वीच कारवाई करण्यात आल्याचा आरोप. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन झाले का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यात आणखी भर म्हणजे कारवाईनंतर दूध उत्पादकांना मदर डेअरीकडे दूध देण्याचा सल्ला देण्यात आल्याने काही शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. गोरस भंडार बंद झाल्यास त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, कारखान्यात काही प्रमाणात अस्वच्छता आढळल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र थेट सील ठोकण्याचा निर्णय योग्य होता का, यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. आता सर्वांचे लक्ष तपास अहवालाकडे लागले असून, सत्य नेमके काय हे त्यातूनच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button